www.24taas.com, वृत्तसंस्था, सॅन फ्रान्सिस्को
टॅबलेटच्या दुनियेत आणखी एक महत्त्वाचं लॉन्चिंग करण्यात आलंय. नोकियाच्या ४जी टॅबलेट लाँच झाल्यानंतर आता अॅपलनं सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आयपॅडच्या दुनियेत धमाका करत सर्वात हलक्या वजनाचा आणि स्लीम असा आयपॅड एअर लॉन्च केलाय.
आपल्या आधीच्या आयपॅडपेक्षा तब्बल २० टक्के हलका आणि पातळ असा हा बहुचर्चित रेटिना डिस्प्ले असलेला आयपॅड आहे. आयपॅड एअरच्या घोषणेनंतर अमेरिकी शेअर बाजारात अॅपलच्या शेअर्सनं चांगली सुधारणा केलीय. ५२१ डॉलर्सच्याही पुढं अॅपलचा शेअर पोहोचलाय.
आयपॅड एअरचं वजन ४५० ग्राम असून या आजपर्यंत लॉन्च झालेल्या आयपॅडमध्ये हा सर्वात हलका टॅबलेट असल्याचा दावा अॅपलनं केलाय. अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक म्हणाले की सध्या ४,७५,००० असे अॅप्स आहेत जे आयपॅडवर वापरू शकतो.
नव्या आयपॅड मिनीला रेटीना डिस्प्ले दिला गेला आहे. तज्ज्ञांच्या मते गूगलची अँड्राईड ही ऑपरेटिंग सिस्टीम असलेले टॅबलेट आणि स्मार्टफोन सर्वाधिक विक्रीच्या जोरावर अॅपलच्या उत्पादनांना मागे टाकू पाहात असतानाच अॅपलनं आयपॅड एअरची घोषणा केलीय.
९.७ इंच स्क्रीन असलेला हा आयपॅड, ७.५ मीमी जाडीचा आहे. या आयपॅड एअरमध्ये आयफोन ५एस मध्ये असलेली A७ प्रोसेसिंग चीप असल्याचा अॅपलनं स्पष्ट केलंय. तर डिस्प्लेचं रिझॉलूशन वाढवून २०४८ x १५३६ पिक्सेल इतकं करण्यात आलंय. आधी १५३६ इतकं रिझॉलूशन होतं. त्यामुळं तुम्हाला आधीच्या आयपॅडच्या तुलनेत अधिक चांगलं आणि स्पष्ट चित्र बघायला मिळू शकेल. अॅपलच्या आयपॅड मिनीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात असलेला रेटिना डिस्प्ले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.