www.24taas.com, कोलंबो
टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी पहिला पेपर अतिशय सोपा असणार आहे. धोनी अँडी कंपनीची सलामीची मॅच असणार आहे ती दुबळ्या अफगाणिस्तानची. दुस-या टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळणाऱ्या अफगाणिस्तानच्या टीमला गमावण्सारखं काहीच नसणार आहे. भारतीय टीम कमकुवत अफगाणिस्तानवर मात करत टी-२० वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी देण्यासाठी प्रयत्नशील असेल.
टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची मिशन वर्ल्ड कपची सुरुवात अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचनं होणार आहे. या मॅचमध्ये भारतासमोर आव्हान असणार ते मोठ्या फरकानं बाजी मारण्याचं... भारतीय टीमची कामगिरी गेल्या काही मॅचेसमध्ये चांगली झाली. या मॅचमध्ये टीम इंडियाच्या बॅट्समन आणि बॉलर्सना आपला फॉर्म दाखवण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे.
गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग ही जोडी सातत्यानं अपयशी ठरतेय. त्यामुळे त्यांना या मॅचमध्ये आपला फॉर्म सुधारण्याचं आव्हान असणार आहे. विराट कोहली हा सध्या भारताचा सर्वोत्तम बॅट्समन ठरतोय. त्यामुळे त्याची स्फोटक फटकेबाजी पाहायला मिळणार आहे. टेस्ट आणि वन-डेमध्ये त्यानं आपल्या बॅटनं भारताला अनेक अविस्मरणी विजय मिळवून दिले आहेत. आता क्रिकेटच्या शॉर्टर फॉर्ममध्येही तो आपला जलवा दाखवण्यास आतूर आहे. युवराज सिंग या कमबॅक मॅनच्या कामगिरीकडेही लक्ष असेल. कॅन्सरशी यशस्वी लढा दिल्यानंतर क्रिकेटप्रेमींच्या नजरा या त्याच्यावरच असणार आहेत.
इरफान पठाण आणि बालाजीची बॉलिंग चांगली होतेय. झहीर खानवरही भारताला ब्रेक थ्रू मिळवून देण्याची जबाबदारी असेल. हरभजन सिंग आणि आर अश्विन या स्पिनर्सचा फॉर्मही निर्णायक ठरणार आहे. अफगाणिस्तानची टीम नवीन असल्यानं त्यांना भारताच्या कडव्या आव्हानाला समोर जाव लागणार आहे. आता बलाढ्या टीम इंडियाला अफागाणिस्तानची टीम जोरदार टक्कर देते का? ते पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.