झहीर खानचा टीम इंडियाला सल्ला, मोठी धावसंख्या हवी!

टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात कसोटी क्रिकेटमध्ये सपाटून मार खल्ल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर जोरदार टीका होऊ लागली. आता तर फास्टर बॉलर झहीर खानने टीम इंडियातील खेळाडूंना सल्ला दिलाय. तुम्हाला जर जिंकायचे असेल तर मोठी धावसंख्या उभारण्याची गरज आहे. तरच परदेशात तुम्ही चांगला प्रभाव पाडू शकता, असे झहीर म्हणाला.

Updated: Aug 23, 2014, 04:39 PM IST
झहीर खानचा टीम इंडियाला सल्ला, मोठी धावसंख्या हवी! title=

नवी दिल्ली : टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात कसोटी क्रिकेटमध्ये सपाटून मार खल्ल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर जोरदार टीका होऊ लागली. आता तर फास्टर बॉलर झहीर खानने टीम इंडियातील खेळाडूंना सल्ला दिलाय. तुम्हाला जर जिंकायचे असेल तर मोठी धावसंख्या उभारण्याची गरज आहे. तरच परदेशात तुम्ही चांगला प्रभाव पाडू शकता, असे झहीर म्हणाला.

भारत इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ३-१ अशा फरकाने हरला. यापैकी दोन सामने तीन दिवसांमध्ये आटोपलेत. याबाबत झहीर हा सल्ला दिला. पहिल्या डावात फलंदाजांनी ३५० धावा उभारल्या, तर तुम्ही लढत देऊ शकता. जर हे तुम्हाला शक्य झाले नाही, तर सामन्यात तुम्हाला झगडावे लागते.

या आधी परदेशात जे काही यश मिळाले होते ते मोठय़ा धावसंख्येमुळे होते. फलंदाजांनी चांगली खेळी करत धावांचा डोंगर रचला आहे. त्यामुळे गोलंदाजांना बळी मिळवून विजय मिळवता आला आहे, असे झहीरने सांगितले.

आगामी चॅम्पियन्स लीग टी - २० क्रिकेट स्पर्धेत आपण खेळू शकणार नसल्याचे संकेत झहीरने या वेळी दिले. परंतु लवकरच मैदानावर परतू शकेन, असा आशावाद मात्र त्याने  व्यक्त केला. मी आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणाव आणि दडपण हाताळू शकेन आणि त्यानंतरच मी पुनरागमनाचा विचार करेन, असे झहीरने सांगितले. वानखेडे स्टेडियमवर ३ मे रोजी मुंबई इंडियन्सकडून किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध आयपीएलचा सामना खेळत असताना झहीरला दुखापत झाली. तेव्हापासून झहीर संघाबाहेर आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.