सागरिकाच्या नावावरुन युवराजने उडवली झहीरची खिल्ली

भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खान सध्या त्याच्या लव्ह अफेयरमुळे चांगलाच चर्चेत आहे. अभिनेत्री सागरिका घाटगे आणि झहीर खान यांच्यातील अफेयरच्या चर्चांना आता उधाण आलेय. दोघांना अनेकदा पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिले गेलेय.

Updated: Feb 18, 2017, 12:58 PM IST
सागरिकाच्या नावावरुन युवराजने उडवली झहीरची खिल्ली title=

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खान सध्या त्याच्या लव्ह अफेयरमुळे चांगलाच चर्चेत आहे. अभिनेत्री सागरिका घाटगे आणि झहीर खान यांच्यातील अफेयरच्या चर्चांना आता उधाण आलेय. दोघांना अनेकदा पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिले गेलेय.

मात्र यावेळी युवराज सिंगने सागरिकाच्या नावाने झहीरची ट्विटरवर खिल्ली उडवलीये. या ट्विटमध्ये युवराजने सागरिकाला तिच्या सिनेमासाठी शुभेच्छा दिल्यातच त्यासोबत भारताच्या उपकर्णधाराला डेट करणे चांगली गोष्ट होती मात्र बरं झालं तुम्ही रिअल लाईफमध्ये असं केल नाही. 

२००७मध्ये आलेल्या चक दे इंडिया या सिनेमात सागरिकाने प्रीत सबरवालची भूमिका केली होतीय यात प्रितीचे भारताच्या उपकर्णधाराशी अफेयर दाखवले आहे. 

भारताचा क्रिकेटपटू युवराजच्या लग्नातही झहीर आणि सागरिकाने हजेरी लावली होती. या सोहळ्यात दोघे एकत्रच होते. तेव्हापासून यांच्या अफेयरच्या चर्चा रंगल्यात.