रणजीमध्ये युवराजचा धमाका

मध्य प्रदेशविरुद्धच्या रणजी मॅचमध्ये युवराज सिंगनं नाबाद 164 रनची अफलातून खेळी केली आहे.

Updated: Oct 13, 2016, 08:11 PM IST
रणजीमध्ये युवराजचा धमाका title=

रोहटक : मध्य प्रदेशविरुद्धच्या रणजी मॅचमध्ये युवराज सिंगनं नाबाद 164 रनची अफलातून खेळी केली आहे. या मॅचमध्ये टॉस जिंकून पंजाबनं पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण पंजाबची अवस्था 2 बाद 15 अशी झाली. यानंतर युवराजनं जीवनज्योत सिंगबरोबर 180 रनची आणि गुरुकिरत सिंगबरोबर नाबाद 152 रनची पार्टनरशीप केली.

प्रथम श्रेणी क्रिकेटमधली युवराजची ही 25वी सेंच्युरी आहे. या सेंच्युरीमुळे युवराजनं निवड समितीला त्याचा विचार करायला भाग पाडलं आहे. युवराजनं डिसेंबर 2013मध्ये शेवटची आंतरराष्ट्रीय वनडे खेळली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या तीन वनडेसाठीची टीम घोषीत करण्यात आली आहे. त्यामुळे पुढच्या दोन वनडेसाठी निवड समिती युवराजबाबत काय निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.