हैदराबादच्या विजयानंतर युवराज-हेजलचं सेलिब्रेशन

आयपीएलच्या नवव्या सिझनच्या फायनलमध्ये हैदराबादनं बैंगळुरुला हरवून जेतेपद पटकवलं.

Updated: May 31, 2016, 07:39 PM IST
हैदराबादच्या विजयानंतर युवराज-हेजलचं सेलिब्रेशन title=

हैदराबाद : आयपीएलच्या नवव्या सिझनच्या फायनलमध्ये हैदराबादनं बैंगळुरुला हरवून जेतेपद पटकवलं. या विजयाचं हैदराबादच्या टीमनं जंगी सेलिब्रेशन केलं. 

मॅच संपल्यानंतर हॉटेलवर जातानाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ युवराज सिंगनं शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये युवराजबरोबर त्याची होणारी बायको हेजलही जल्लोष करताना दिसत आहे. 

आयपीएलच्या फायनलमध्ये हैदराबादनं बंगळुरुपुढे विजयासाठी 209 रनचं आव्हान उभं केलं. या मॅचमध्ये युवराजनं 23 बॉलमध्ये 38 रन केल्या होत्या. 

पाहा युवी-हेजलचा विजयाचा जल्लोष