धोनी का म्हणाला 'अच्छा तो हम चलते है'?

कसोटी निवृत्तीचा निर्णय महेंद्रसिंग धोनीनं घेतला... हा निर्णय तडकाफडकी घेतल्याची भावना त्याच्या चाहत्यांची आहे. मात्र अत्यंत डोकेबाज कर्णधार अशी ओळख असलेल्या माहिनं हा महत्त्वाचा निर्णय पूर्ण विचाराअंतीच घेतला आहे यात शंका नाही.

Updated: Dec 30, 2014, 08:37 PM IST
धोनी का म्हणाला 'अच्छा तो हम चलते है'?  title=

मुंबई : कसोटी निवृत्तीचा निर्णय महेंद्रसिंग धोनीनं घेतला... हा निर्णय तडकाफडकी घेतल्याची भावना त्याच्या चाहत्यांची आहे. मात्र अत्यंत डोकेबाज कर्णधार अशी ओळख असलेल्या माहिनं हा महत्त्वाचा निर्णय पूर्ण विचाराअंतीच घेतला आहे यात शंका नाही.

आजपासून बरोबर ९ वर्षांपूर्वी... म्हणजेच २००५ मध्ये महेंद्रसिंग धोनी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता तो श्रीलंकेविरोधातला... विशेष म्हणजे तो सामन्याचा पाचवा दिवस होता आणि ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न इथल्या कसोटीत पाचव्या दिवशी केलेली फलंदाजी, ही धोनीची कसोटी कारकिर्दीतली शेवटची फलंदाजी ठरलीय.

क्रिकेट आणि त्यातही धोनीचा चाहता म्हणून, त्याच्या कसोटी निवृत्तीच्या तडकाफडकी निर्णयाचा, तुम्हाला धक्का बसणं स्वाभाविकच आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या मातीत कसोटी मालिका गमावलेल्या टीम इंडियाला असं मध्येच सोडून, भारतीय क्रिकेटचा हा सगळ्यात यशस्वी कर्णधार, असा घाईघाईत कसोटी निवृत्तीचा निर्णय का घेऊन बसला असेल? हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे. 

कसोटी संन्यासाचा निर्णय जाहीर करताना, माहीनं ‘अच्छा तो हम चलते है’ हे वाक्य म्हटलं. त्या वाक्याचं विश्लेषण करताना, अत्यंत विचारी अशा या कर्णधाराच्या कसोटी निवृत्तीच्या या निर्णयामागेही ठोस कारणं असल्याचंच दिसून येतंय. 

‘बॉलर्स को धो डाला’ या शैलीच्या धोनीचा स्वाभाविक कल हा वनडे आणि टी-ट्वेंटीकडेच राहिलाय तर टेस्टमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा खेळ सतत घसरत असल्याचं आढळून आलंय. यातूनच धोनी टेस्ट मॅचचा भार उचलायला सध्या असमर्थ ठरत असल्याचं स्पष्ट झालंय. 
 
धोनीच्या निर्णयानंतर बीसीसीआयनं प्रसिद्धीपत्रक काढलं. त्यात शरीरावर वाढत्या तणावाचा विचार करता, धोनीनं टेस्टला अलविदा करण्याचा निर्णय घेतल्याचं बीसीसीआयनं म्हटलंय. जेणेकरुन वनडे आणि टी-ट्वेंटी प्रकारावर धोनीला अधिक लक्ष केंद्रीत करणं शक्य होणार असल्याचंही बीसीसीआयनं म्हटलंय. 
 
मात्र, यात विचार करायला लावणारी बाब ही आहे, की टीम इंडियानं आधीच ऑस्ट्रेलिया  विरोधातली टेस्ट सिरीज गमावलीय. तिसरी टेस्ट ड्रॉ केली गेलीय आणि चौथी टेस्ट अजून खेळली जाणार आहे. 
 
तरीही कसोटी निवृत्तीचा निर्णय माहिनं घाईनं घेतला कारण, मालिका संपल्यानंतर देशाबाहेरच्या सामन्यांत कर्णधार म्हणून धोनीच्या सहाव्या पराभवाकरता कोणी त्याच्याकडे बोट दाखवू नये... मेलबर्नमधल्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेला धोनी हसतमुख चेहऱ्यानं सामोरा गेला. त्याच्या या हास्यानंच अनेक प्रश्नांची उत्तरं दिलीत. 

धोनीनं टेस्टला गुडबाय करण्यामागे आणखी एक महत्त्वाचं कारण आहे... २०१४ या वर्षात भारतीय उपखंडातल्या देशांपैकी टीम इंडियाची कामगिरी अत्यंत सुमार राहिलीय. 
- बांग्लादेश या वर्षात ४२ पॉईंट ८६ अंकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. 
- ४१ पॉईंट ६७ गुणांसह श्रीलंका दुसऱ्या नंबरवर आहे. 
- चाळीस पॉईंट्ससह पाकिस्तान तिसऱ्या स्थानी आहे. 
- तर भारत अवघ्या १० अंकांची कमाई करत, सर्वात शेवटच्या पायरीवर आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.