...म्हणून आयपीएलच्या फायनलला नाही गेली अनुष्का

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आजारी असल्यामुळे आपला आगामी चित्रपट 'दिल धडकने दो'च्या टीम सह आयपीएलच्या फायनलला गेली नाही. आजारी असल्यामुळे चित्रपटाच्या टीमसह मजा-मस्ती करू शकली नाही, या बद्दल तिला खूप वाईट वाटले. 

Updated: May 25, 2015, 06:37 PM IST
...म्हणून आयपीएलच्या फायनलला नाही गेली अनुष्का title=

कोलकता : बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आजारी असल्यामुळे आपला आगामी चित्रपट 'दिल धडकने दो'च्या टीम सह आयपीएलच्या फायनलला गेली नाही. आजारी असल्यामुळे चित्रपटाच्या टीमसह मजा-मस्ती करू शकली नाही, या बद्दल तिला खूप वाईट वाटले. 

अनुष्काने ट्विटरवर लिहिले की, ' मित्रांनो, आजारी असल्यामुळे तुमच्यासोबत मजा-मस्ती करू नाही शकली. मला खूप वाईट वाटते आहे. पण लवकरच तुमच्यासोबत मस्ती करण्यासाठी जाइन होईल. 

दिग्दर्शक जोया अख्तरचा चित्रपट 'दिल धडकने दो'मध्ये अनिल कपूर, प्रियंका चोपडा, शेफाली शाह, फरहान अख्तर, रणवीर सिंह आणि अनुष्का यांनी काम केले आहे. पाच जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

अनिल, रणवीर, फरहान आणि चित्रपटाचा निर्माता रितेश सिधवानी चित्रपटाच्या प्रचारासाठी रविवारी रात्री कोलकताच्या इडन गार्डन्समध्ये आयपीएलच्या फायनलसाठी उपस्थित होते. 

चित्रपटाच्या टीमने कोलकतामध्ये खूप मजा-मस्ती केली. सुप्रसिद्ध के. सी. दास हलवाईच्या दुकानात बंगाली मिठाई 'संदेश' मिष्टी दोई आणि खीर खाल्ली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.