पाऊस पडल्यास भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याचं काय होणार

भारताला त्यांचा शेवटचा सामना हा ऑस्ट्रेलियाच्या विरोधात खेळायचा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघं संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ सेमीफायनलमध्ये जाईल.

Updated: Mar 25, 2016, 08:53 PM IST
पाऊस पडल्यास भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याचं काय होणार title=

मुंबई : भारताला त्यांचा शेवटचा सामना हा ऑस्ट्रेलियाच्या विरोधात खेळायचा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघं संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ सेमीफायनलमध्ये जाईल.

भारताने ३ पैकी २ सामने जिंकले आहे तर ऑस्ट्रेलियाने ही ३ पैकी २ सामने जिंकले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघांचे ४-४ गुण आहेत. त्यामुळे जो संघ जिंकेल त्याला सेमीफायनलचं तिकीट मिळेल.

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान जर पाऊस झाला आणि मॅच जर ड्रॉ झाली तर दोघं संघांना १-१ गुण देण्यात येईल. पण सेमीफायनल मध्ये जाण्याची संधी ही ऑस्ट्रेलियाला मिळेल. कारण भारताचे गुण हे -०.५४६ आहे तर ऑस्ट्रेलियाचे गुण +०.४४० आहे. रन रेटच्या हिशोबाने ऑस्ट्रेलियाकडे मोठी संधी आहे. पण जर भारताला सेमीफायनल गाठायची आहे तर त्यांना हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल.