हैदराबाद : चॅम्पियन्स लीग टी- 20मध्ये बुधवारी झालेल्या कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्या सामन्याच्या दरम्यान, जिथं महेंद्र सिंग धोनी आणि गौतम गंभीर जिंकण्यासाठी ऐकमेंकांच्या विरूद्ध उभे होते. तिथं त्यांच्या पत्नी मात्र घट्ट मैत्रिणी झाल्या आहेत.
धोनीची पत्नी साक्षी सिंग धोनी आणि गंभीरची पत्नी नताशा गौतम गंभीर आणि गंभीरची मुलगी हे एकत्र एकाच स्टॅन्डमध्ये बसल्या होत्या.या दरम्यान, गंभीरची मुलगी आजीनला साक्षीनं तिच्या जवळ घेतली होती. त्यामुळं लोकांमध्ये थोडा वेळ संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. आजीननं कोलकाता नाइट रायडर्सचा टी-शर्ट परिधान केला होता.
साक्षी आणि नताशाच्या सोबत अजून एक नाव येतं. ते म्हणजे माजी केंद्रीय उड्डयन मंत्री प्रफुल्ल पटेल यांची मुलगी पूर्णा पटेल हिचा ही समावेश होता. सुरेश रैना आणि पूर्णा हे कित्येक दिवसांपासून ऐकमेंकांसोबत डेटिंग करत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. दोघांनी एकत्र पूजा देखील केल्याचे फोटो सुद्धा प्रसिद्ध झाले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.