पोर्तुगालने पहिल्यांदा युरो कपवर कोरलं नाव

पोर्तुगालने फ्रांसचा पराभव करत यूरो कपवर आपलं नाव कोरलं आहे. अतिशय रोमांचक सामन्यामध्ये पोर्तुगालने फ्रांसला 1-0 ने हरवलं. फ्रांस तिसऱ्यांदा यूरो कप जिंकण्यापासून चुकला.

Updated: Jul 11, 2016, 09:17 AM IST
पोर्तुगालने पहिल्यांदा युरो कपवर कोरलं नाव title=

मुंबई : पोर्तुगालने फ्रांसचा पराभव करत यूरो कपवर आपलं नाव कोरलं आहे. अतिशय रोमांचक सामन्यामध्ये पोर्तुगालने फ्रांसला 1-0 ने हरवलं. फ्रांस तिसऱ्यांदा यूरो कप जिंकण्यापासून चुकला.

९० मिनटांपर्यंत दोघांनेही एकही गोल केला नव्हता. यानंतर १५ मिनिटांचा वेळ वाढवण्यात आला तरी कोणताही गोल नाही झाला. पण १५ मिनिटांच्या नंतर वाढीव वेळेत पोर्तुगालने संधी साधली आणि गोल केला.

फ्रांसचे खेळाडू एकही गोल नाही करु शकले आणि पोर्तुगालने कपवर आपलं नाव कोरलं. मॅचदरम्यान जगातील एक उत्कृष्ठ फुटबॉलपटू पोर्तुगालचा खेळाडू रोनाल्डो जखमी झाल्याने त्याला मैदानातून बाहेर जावं लागलं. पण त्याच्या संघाने फायनल जिंकली. पोर्तुगालकडून राखीव खेळाडू ऐडरने गोल केला आणि हा फक्त एकच गोल संपूर्ण मॅचमध्ये झाला. ऐडर हा फायनलचा हिरो ठरला. ९५ वर्षापासून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणाऱ्या पोर्तुगालने पहिल्यांदाच एवढी मोठी टुर्नामेंट जिंकली आहे.

पाहा व्हिडिओ