वीरुने खास शैलीत विराटला दिल्या शुभेच्छा

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा आज बर्थडे आहे. देशभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. 

Updated: Nov 5, 2016, 10:36 AM IST
 वीरुने खास शैलीत विराटला दिल्या शुभेच्छा title=

मुंबई : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा आज बर्थडे आहे. देशभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. 

मध्यरात्रीपासूनच #HappyBirthdayVirat हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहे. असे असले तरी विराटसाठी बर्थडेचा बेस्ट मेसेज ट्विटर किंग आणि भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचाच असावा.

विराच्या 28व्या वाढदिवसानिमित्त वीरुने खास त्याच्या स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्यात. त्याने शुभेच्छांमध्ये विराट नव्हे तर चिकू असा उल्लेख केलाय.