सेहवागचा 'मेहनती मोहम्मद'वर निशाणा

भारताचा बॅट्समन मोहम्मद कैफ हा नॅटवेस्ट सीरिजच्या फायनलमध्ये खेळलेल्या त्याच्या इनिंगमुळे कायमच चर्चेत राहिलेल्या मोहम्मद कैफनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दहा हजार रनचा टप्पा ओलांडला आहे.

Updated: Oct 10, 2016, 04:41 PM IST
सेहवागचा 'मेहनती मोहम्मद'वर निशाणा title=

मुंबई : भारताचा बॅट्समन मोहम्मद कैफ हा नॅटवेस्ट सीरिजच्या फायनलमध्ये खेळलेल्या त्याच्या इनिंगमुळे कायमच चर्चेत राहिलेल्या मोहम्मद कैफनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दहा हजार रनचा टप्पा ओलांडला आहे. छत्तीसगडकडून खेळताना कैफनं त्रिपुराविरुद्ध 27 रनची खेळी करून या रेकॉर्डला गवसणी घातली.

दहा हजार पन पूर्ण केल्यावर कैफचं अभिनंदन करताना भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं ट्विटरवरून चिमटे काढले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 10 हजार रन पूर्ण केल्याबद्दल कैफचं अभिनंदन. यातल्या नऊ हजार रन तू पळूनच काढल्या असशील. पकडा पकडी तुझा दुसरा आवडता खेळ आहे का, असं ट्विट सेहवागनं केलं आहे.

सेहवागच्या या ट्विटला मोहम्मद कैफनंही उत्तर दिलं आहे. विरू धन्यवाद. फोर आणि सिक्स मारून 80 टक्के रन काढणं आणि सिक्स मारून 300 रन पूर्ण करणं प्रत्येकाला जमत नाही, असं ट्विट कैफनं केलं आहे.