आयपीएल ९ : हा क्रिकेटर ठरलाय सर्वात जास्त मानधन घेणारा खेळाडू!

'आयपीएल सीझन ९' येत्या ९ एप्रिलपासून सुरू होणार आहे. पण, तुम्हाला माहीत आहे की यासाठी सर्वात जास्त मानधन कोणत्या खेळाडूला मिळणार आहे?

Updated: Apr 6, 2016, 03:43 PM IST
आयपीएल ९ : हा क्रिकेटर ठरलाय सर्वात जास्त मानधन घेणारा खेळाडू! title=

मुंबई : 'आयपीएल सीझन ९' येत्या ९ एप्रिलपासून सुरू होणार आहे. पण, तुम्हाला माहीत आहे की यासाठी सर्वात जास्त मानधन कोणत्या खेळाडूला मिळणार आहे?

कदाचित तुम्हाला अंदाजा असेलच... हा खेळाडू आहे अँग्री यंग क्रिकेटर विराट कोहली... रिटेन प्लेअर्सला मिळणाऱ्या मानधनाची लिस्ट जाहीर झाल्यानंतर ही गोष्ट समोर आलीय. 

कुणाला मिळणार किती मानधन?

विराट कोहलीला 'रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू'कडून(RCB)तब्बल १५ करोड रुपयांचं मानधन मिळणार आहे.  

विराटनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत ते कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी आणि शिखर धवन... धोनीला पुणे टीमकडून १२ करोड, तर धवनला हैदराबाद टीमकडून १२ करोड रुपये मिळणार आहेत

तिसऱ्या क्रमांकावर आहे रोहित शर्मा... मुंबई इंडियन्सकडून रोहितला ११.५० करोड रुपये मिळणार आहे. 

कोलकता नाईट रायडर्स टीमकडून गौतम गंभीरला १० करोड रुपये मिळणार आहे. तो या लिस्टमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. 

तर पाचव्या क्रमांकावर आहे हरभजन सिंह... मुंबई इंडियन्स भज्जीला ८ करोड रुपये देणार आहे.