बांगलादेशच्या त्या निर्णयावर विराटला आले हसू

भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकमेव कसोटीतील पहिल्या दिवशी भारताने जबरदस्त फलंदाजी करताना साडेतीनशेपार धावांचा टप्पा गाठला होता. पहिल्या दिवसातील खेळादरम्यान असा काही प्रसंग घडला की बांगलादेशच्या कर्णधाराच्या निर्णयावर विराट कोहलीला हसू आवरले नाही.

Updated: Feb 10, 2017, 01:31 PM IST
बांगलादेशच्या त्या निर्णयावर विराटला आले हसू title=

हैदराबाद : भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकमेव कसोटीतील पहिल्या दिवशी भारताने जबरदस्त फलंदाजी करताना साडेतीनशेपार धावांचा टप्पा गाठला होता. पहिल्या दिवसातील खेळादरम्यान असा काही प्रसंग घडला की बांगलादेशच्या कर्णधाराच्या निर्णयावर विराट कोहलीला हसू आवरले नाही.

ही घटना सामन्यातील ६२व्या षटकांत घडली. त्यावेळी विराट कोहली स्ट्राईकवर होता आणि त्याच्यासमोर मुरली विजय होता. तैजुल इस्लामच्या गोलंदाजीवर विराटने शानदार शॉट खेळला. मात्र तो धाव घेण्यासाठी धावला नाही. 

यावेळी बांगलादेशचा विकेटकीपर मुशफिकर रहीमने अंपायरकडे एलबीडब्लूची अपील केले मात्र ते फेटाळले गेले. 

त्यानंतर अचानक त्याने विचार न करता डीआरएसची मागणी केली. या गोष्टीवर विराटला हसू आले. जेव्हा टीव्ही रिप्ले समोर आला तेव्हा मुशफिकरला आपली चूक लक्षात आली. तसेच विराटच्या हसण्याचे कारण समजले आणि शरमेने त्याने मान खाली घातली.