मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू वसिम जाफर यानं आज रणजी ट्रॉफीच्या इतिहासात आपलं नाव उमटवलंय. रणजी ट्रॉफीमध्ये 10,000 रन्स ठोकणारा वसिम जाफर एकमेव खेळाडू ठरलाय.
'रणजी ट्रॉफी'साठी बंगळुरू विरुद्ध खेळताना जफरनं हा रेकॉर्ड रचलाय.
#OnThisDay in 1996, Wasim Jaffer hit 314* in a First Class match for Mumbai at the age of just 18 pic.twitter.com/7sODZwXWor
— ICC (@ICC) November 7, 2015
घरगुती क्रिकेट मैदानावर रन मशिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जफरनं 1996 - 97 मध्ये त्याच्या करिअरमधल्या दुसऱ्याच मॅचमध्ये ट्रिपल सेन्चुरी ठोकण्याचा पराक्रम केला होता. 2000 साली त्याला टेस्ट क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. परंतु, त्याच्या खेळाचा चढता-उतरता आलेखामुळे मात्र त्याला आंतरराष्ट्रीय खेळातून त्याची हकालपट्टी झाली. 31 टेस्टमध्ये जफरनं 1,944 रन्स ठोकले होते.
त्यानंतर, मुंबईच्या संघातून खेळणाऱ्या जफरची रणजी ट्रॉफी 2015-16 साठी विदर्भाच्या टीममध्ये बदली करण्यात आली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.