अनुष्काबद्दलचं ते ट्विट विराटनं केलं डिलीट

व्हॅलेंटाईन डे निमित्त विराट कोहलीनं अनुष्का शर्माबद्दल केलेलं ट्विट डिलीट केलं आहे.

Updated: Feb 16, 2017, 11:35 PM IST
अनुष्काबद्दलचं ते ट्विट विराटनं केलं डिलीट  title=

मुंबई : व्हॅलेंटाईन डे निमित्त विराट कोहलीनं अनुष्का शर्माबद्दल केलेलं ट्विट डिलीट केलं आहे. फेसबूकवरही विराटनं अनुष्कासोबतचा फोटो डिलीट केला आहे.  विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आपल्या नात्याबद्दल कधीही खुलेपणाने बोलत नाहीत. मात्र व्हॅलेंटाइन्स डेच्या दिवशी मात्र विराट कोहलीने आपले प्रेम सोशल मीडियाद्वारे जाहीर केलं होतं.

व्हॅलेंटाइन्स डे निमित्त विराटने अनुष्कासाठी प्रेमाचा संदेश लिहिलेली एक पोस्ट ट्विटर आणि फेसबूकवर पोस्ट केली होती. 'तुझी इच्छा असेल तर प्रत्येक दिवस व्हॅलेंटाइन्स डे असेल. अनुष्का तुझ्यामुळे माझा प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन्स डे असतो.' असं त्याने म्हटलं होतं. ट्विटर आणि फेसबूकवरून हा फोटो काढून टाकण्यात आला असला तरी इन्स्टाग्रामवर मात्र तो फोटो अजूनही आहे.

कोहली आणि अनुष्का गेल्या अनेक दिवसांपासून एकत्र आहेत. अनेकदा त्यांना एकत्र पाहिले गेलेय. काही दिवसांपूर्वी नवीन वर्षाच्या सुरुवातीला देहरादूनमध्ये हे दोघेही लग्न करणाऱ असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. मात्र विराटने ट्विट करुन हे वृत्त फेटाळून लावले.