मुंबई : टीम इंडियाचा टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली सध्या टीम इंडियाच्या बाहेर राहून आराम करत आहे.
अभिनेत्री अनुष्का शर्माशी ब्रेकअप झाल्यावर तो पहिला व्हॅलेंटाइन डे साजरा करत होता. पण त्याने खास अंदाजात हा क्षण साजरा केला.
विराट कोहली याने व्हॅलेंटाइन डे कसा साजरा केला याचा एक फोटो ट्विटरवर टाकलाा आहे. कोहलीने १४ फेब्रुवारीला दिल्लीच्या खान मार्केटच्या टाऊनहॉल रेस्टॉरंटला गेला होता. त्या ठिकाणी त्याने सुशी ही जपानी डीश खाल्ली...
Brilliant Sushi at Townhall Khan Market. Lovely place and great vibe. Love it pic.twitter.com/qNf1lEOBgq
— Virat Kohli (@imVkohli) February 14, 2016
मीडियामध्ये आलेल्या बातम्यांना खरे मानले तर त्यांचा ब्रेकअप झाला आहे. त्यामुळे अनुष्का विराटला भेटायला ऑस्ट्रेलियाला गेली नाही. तसेच दोघांनी ट्विटर आणि इन्स्टाग्राममधून एकमेकांना अनफॉलो केले.
विराट कोहलीने अनुष्काला प्रपोज केले होते. पण तिने नकार दिला. त्यानंतर दोघांमध्ये भांडण झाल्याची बातमी आहे.