टॉस जिंकल्यानंतर विराट ही गोष्ट विसरला

सनराइजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात मॅच रंगतेय. टॉस जिंकत प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेणाऱ्या कोहलीला एका गोष्टीचा विसर पडला.

Updated: Apr 30, 2016, 10:28 PM IST
टॉस जिंकल्यानंतर विराट ही गोष्ट विसरला title=

नवी दिल्ली : सनराइजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात मॅच रंगतेय. टॉस जिंकत प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेणाऱ्या कोहलीला एका गोष्टीचा विसर पडला.

पावसाच्या व्यत्ययामुळे सामना उशिरा सुरु झाला असला तरी मॅच ४० ओव्हरचीच होणार आहे. कोहलीने टीममध्ये ३ बदल केल्याची माहिती दिली पण प्रत्यक्षात मात्र त्याने ४ बदल केले होते. 

टीममध्ये स्टुअर्ट बिन्नीच्या जागी वरुण एरॉन तर चहलच्या जागी हर्षल पटेलला संधी देण्यात आली आहे. सचिन बेबी याला सरफराजच्या जागी तर इकबालच्या जागी परवेज रसूलला संघात जागा मिळाली आहे. क्रिस गेलही संघाबाहेर आहे. 

केन विलियमसन हा हैदराबद टीममध्ये पुन्हा आला आहे.

पाहा लाईव्ह स्कोरकार्ड