विराटची ही चाहती पोहोचली भारतात

जगातील सर्वात धडाकेबाज खेळाडू विराट कोहली हा त्याच्या जबरदस्त खेळामुळे अनेकांच्या मनावर राज करतोय. त्याच्या जगभरात अनेक चाहते आहेत. काही महिला खेळाडू देखील त्याच्या चाहत्यांच्या यादीत आहेत.

Updated: Mar 14, 2016, 12:56 PM IST
विराटची ही चाहती पोहोचली भारतात title=

मुंबई : जगातील सर्वात धडाकेबाज खेळाडू विराट कोहली हा त्याच्या जबरदस्त खेळामुळे अनेकांच्या मनावर राज करतोय. त्याच्या जगभरात अनेक चाहते आहेत. काही महिला खेळाडू देखील त्याच्या चाहत्यांच्या यादीत आहेत.

अनेकांनी आतापर्यंत विराट बाबतचं त्यांचं क्रश बोलून दाखवलंय. काही मुलींनी तर विराटला प्रपोज देखील केलं आहे. यामध्ये इंग्लंडची महिला खेळाडू डेनिअल व्याट हिचा ही समावेश आहे.

टी-20 वर्ल्डकपचे सामने सुरू झाले आहेत यासाठी ही खेलाडू तिच्या टीमसोबत भारतात आली आहे. डेनिअलने विराटला लग्नासाठी देखील प्रपोज केलं आहे.