कोहलीने केला 100 कोटींचा 'विराट' करार

विराट कोहली एका ब्रँडसोबत 100 कोटीचा करार करणारा पहिला क्रिकेटर बनला आहे. भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीने एका लाइफस्टाइल ब्रँडसोबत करार केला आहे. आठ वर्षासाठी हा करार आहे. विराट कोहलीने लाइफस्‍टाइल ब्रँड प्‍यूमासोबत एकूण 110 कोटींचा करार केला आहे. कोहलीचा आता उसैन बोल्ट, असाफा पॉवेल, थीरी हेनरी, ऑलिवर गिराउड यांच्या यादीत समावेश झाला आहे.

Updated: Feb 20, 2017, 05:40 PM IST
कोहलीने केला 100 कोटींचा 'विराट' करार title=

नवी दिल्ली : विराट कोहली एका ब्रँडसोबत 100 कोटीचा करार करणारा पहिला क्रिकेटर बनला आहे. भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीने एका लाइफस्टाइल ब्रँडसोबत करार केला आहे. आठ वर्षासाठी हा करार आहे. विराट कोहलीने लाइफस्‍टाइल ब्रँड प्‍यूमासोबत एकूण 110 कोटींचा करार केला आहे. कोहलीचा आता उसैन बोल्ट, असाफा पॉवेल, थीरी हेनरी, ऑलिवर गिराउड यांच्या यादीत समावेश झाला आहे.

आठ वर्षाचा हा करार 28 वर्षाच्या कोहलीसोबत संपूर्ण करिअर सोबत राहिलंय. कोहलीला एक रक्कमसह रॉयल्टी देखील मिळणार आहे. कोहली म्हणतो की या कंपनीसोबत अनेक मोठे खेळाडू जोडलेले आहे आणि मला यांच्यासोबत जोडले गेल्यानंतर अभिमान वाटतोय.

सचिन तेंडुलकर आणि महेंद्र सिंह धोनीने देखील 100 कोटींचा करार केला आहे. पण तो एकाच कंपनीकडून नव्हता. सचिनने 50 हून अधिक कंपन्यांशी करार केला. त्यासाठी सचिनला 500 कोटीहून अधिक रक्कम मिळाली. वर्ल्डटेलसोबत सचिनने सर्वाम मोठी डील केली होती. ती 30 कोटींची होती. 2001 मध्ये ती डबल केली गेली होती.