विकास कृष्णनचा विजयी पंच

भारताचा बॉक्सर विकास कृष्णननं ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी दिली. या विजयासह विकानं प्री-क्वार्टरमध्ये दिमाखात प्रवेश केला. 

Updated: Aug 10, 2016, 08:18 AM IST
विकास कृष्णनचा विजयी पंच title=

रिओ : भारताचा बॉक्सर विकास कृष्णननं ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी दिली. या विजयासह विकानं प्री-क्वार्टरमध्ये दिमाखात प्रवेश केला. 

75 किलोवजीनगटात त्यानं अमेरिकेच्या चार्ल्स कॉनवेलला पराभूत करत पुढच्या पाऊंडमधील आपला प्रवेश निश्चित केला. आपल्या पहिल्याच बाऊटमध्ये विकासचंचं वर्चस्व दिसून आलं. त्यानं कॉनवेलला बाऊटमध्ये परतण्याची संधीच दिली नाही. 

आता विकासचा पुढचा मुकाबला हा तुर्कीच्या आँडेर सिपलशी होणार आहे. दरम्यान, 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये वादग्रस्त निर्णयाचा फटका त्याला बसला होता. आता 2016 रियो ऑलिम्पिकमध्ये विकास भारताला बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक मेडल पटाकवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.