माणसाला चावल्याने त्याला 'नऊ इंजेक्शन'

उरुग्वेच्या लुईस सुआरेझने फिफा विश्व चषकात इटलीच्या चिलीनीच्या खांद्याचा चावा घेतला. या प्रकरणी सुआरेझवर नऊ सामने आणि चार महिन्यांची बंदी लावण्यात आली आहे.

Updated: Jun 26, 2014, 07:47 PM IST
माणसाला चावल्याने त्याला 'नऊ इंजेक्शन' title=

नाताल: उरुग्वेच्या लुईस सुआरेझने फिफा विश्व चषकात इटलीच्या चिलीनीच्या खांद्याचा चावा घेतला. या प्रकरणी सुआरेझवर नऊ सामने आणि चार महिन्यांची बंदी लावण्यात आली आहे.

सुआरेझने घेतलेला हा चावा साधासुधा नव्हता, कारण चिलीनीच्या खांद्यावर सुआरेझच्या दात उमटले आहेत. सुआरेझवर फुटबॉल सामने खेळण्यासाठी नऊ महिने बंदी लावली आहे.

चिलीनीला चावा घेतल्याने त्याने यांची अधिकृत तक्रार केली, त्यांनतर फिफाने सुआरेझ आणि उरुग्वेच्या फुटबॉल असोसिएशनला स्पष्टीकरणाची संधी दिली. 

सुआरेझची ही पहिली वेळ नाही, तर प्रतिस्पर्धी खेळाडूंचा चावा घेण्याची ही तिसरी वेळ आहे. उरुग्वेला फार मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 

कारण फिफानं सुआरेझवर बंदीची कारवाई करेल असं म्हटलं जात आहे.

सुआरेझवर कारवाई झाल्याने, बाद फेरीत उरुग्वेला सुआरेझशिवायच मैदानात उतरावं लागणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.