दोन खडूस मुंबईकर आमने-सामने

भारताचा या वर्ल्डकपमधील कमबॅक सर्वांनाच आश्चर्यचकित करून गेलाय... आता भारताच्या दृष्टीनं शनिवारी होणारा सामना एक औपचारिकता असणार आहे... मात्र महाराष्ट्रासाठी विशेषतः मुंबईकरासाठी हा सामना वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे, कारण या सामन्यात उभय संघातले माजी मुंबईकर टीममेट आमने सामने असणार आहेत....

Updated: Feb 26, 2015, 08:54 PM IST
दोन खडूस मुंबईकर आमने-सामने  title=

मुंबई : भारताचा या वर्ल्डकपमधील कमबॅक सर्वांनाच आश्चर्यचकित करून गेलाय... आता भारताच्या दृष्टीनं शनिवारी होणारा सामना एक औपचारिकता असणार आहे... मात्र महाराष्ट्रासाठी विशेषतः मुंबईकरासाठी हा सामना वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे, कारण या सामन्यात उभय संघातले माजी मुंबईकर टीममेट आमने सामने असणार आहेत....

मुंबईचा क्रिकेटर लगेच ओळखता येतो तो त्याच्या खडूसपणामुळे... भारतीय टीम जेंव्हा UAE च्या टीम विरूध्द खेळण्यासाठी मैदानात उतरेल तेंव्हा आणखी एक खडूस मुंबईकर आपल्या खेळानें लक्ष वेधून घेईल स्वप्निल पाटील आणि त्याच्या समोर असेल टीम इंडियाचा खडूस क्रिकेटर अजिंक्य रहाणे... हे दोघे पक्के मुंबईकर... 

दोघांनीही मुंबईच्या अंडर 14,16,19,22 टीममध्ये ड्रेसिंग रूम शेअर केली, एवढचं नाही तर मिडलर ऑर्डरमध्ये बॅटींग करताना अनेक पार्टनरशिप करत मुंबईला विजय मिळवून दिलेत... टीम इंडियामध्ये स्थान मिळवायचं स्वप्न दोघांनी बघितलं... मुंबईच्या रणजीच्या संभाव्य टीममध्ये दोघांनीही आपली दावेदारी सिध्द केली...मात्र त्यानंतर दोघांचे मार्ग वेगवेगळे झाले... अजिंक्यचं टीम इंडियात खेळण्याच स्वप्न पूर्ण झालं, तर स्वप्निल नोकरीनिमित्तानं दुबईला स्थायिक झाला... पण नशिबानं स्वप्निलला साथ दिली आणि तो UAE च्या राष्ट्रीय संघात विकेट किपर बॅटसमन म्हणून दाखल झाला... 

आता ब-याच वर्षांनी हे दोघे मुंबईकर एकमेकांना भेटतील,क्रिकेटच्या मैदानावर मात्र खेळतील एकमेकांविरूध्द... आता या दोघांबरोबरच रोहीत शर्मा आणि धवल कुलकर्णी या दोघांबरोबर मैदानावर दिसतात का हे पाहणही औत्सुक्याच आहे... खरं तरं टीम इंडिया आणि UAE यांच्यातला सामना बघण्यात फारसा कोणाला रस असणार नाही, मात्र स्वप्निलचे कुटुंबीय,त्याचे कोच आणि मित्र यांच्यासाठी मात्र हा सामना वेगळा असणार आहे... 

मुलाने पाहिलेल स्वप्न प्रत्यक्षात येताना त्याला घरात बसून शुभेच्छा देणं हा अनुभव या कुटुंबासाठी मोठा असेल...  आशा करूयात महाराष्ट्रात सुध्दा हा सामना मोठ्या उत्सुकतेने पाहिला जाईल...स्वप्नीलसाठी तर हा कधीही न विसरता येणारा अनुभव असेल... प्रतीक्षा आहे ती या सामन्याचा दिवस उजाडण्याची....

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.