नवी दिल्ली : आशिया कपनंतर आता आयसीसी टी-२० वर्ल्ड कप आजपासून सुरु होत आहे. आशिया चॅम्पियननंतर आता टीम इंडियाच टी-२० वर्ल्ड कपचा प्रमुख दावेदार मानले जात आहे. मात्र, पाच संघ याचा प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
आजपासून पात्रता फेरीचे सामने होत आहे. त्यामुळे कोणती टीम आपली सिद्धता दाखवणार याचीही उत्सुकता आहे. टीम इंडिया दावेदार असली तरी आणची चार टीम या स्पर्धेत आहे.
१. भारत : टीम इंडियासाठी हे वर्ष खास ठरले आहे. कारण ११ सामन्यात १० विजय मिळाले आहेत. भारतीय टीममधील बॉलर आणि बॅटमन्स चांगली कामगिरी करत आहेत.
२. ऑस्ट्रेलिया : वनडेमध्ये वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलियाही दावेदार आहे. ऑस्ट्रेलियन टीम चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे टी-२०चा प्रमुख दावेदार मानला जात आहे.
३. दक्षिण आफ्रिका : दक्षिण आफ्रिका कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करु शकली नाही तर टी-२० क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन करीत आहे. आफ्रिकेने घरच्या मैदानावर इंग्लंड टीमला एकदिवशी सामन्यात ३-१ने आणि टी -२०मध्ये २-० ने हरविले होते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलाय.
४. इंग्लंड : इंग्लंडकडे इयोन मॉर्गन, बेन स्टोक्स, जोस बटलर, एलेक्स हेल्स, जो रुट, सॅम बिलिंग, जेसन रॉय और जेम्स विन्स असे चांगले खेळाडू आहेत. ते टीमसाठी चांगला स्कोर बनवू शकतात.
५. न्यूझीलंड : न्यूझीलंडचा केन विलियम्सन आणि कोरी एंडरसन सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे जाणकारांच्या मते न्यूझीलंड टी-२०मध्ये चांगली कामगिरी करील.