मुंबई : धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने काल आपल्या ३७ व्या वाढदिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण वीरेंद्र सेहवागने असे काही रेकॉर्ड्स केले आहेत. ते करण्यासाठी फक्त आणि फक्त वीरेंद्र सेहवागच बनावे लागेल...
१) सेहवागने १९ वेळा चौका लगावून वन डे इनिंगची सुरूवात केली आहे. असा करणारा तो एकमेव फलंदाज आहे.
२) सेहवाग जगातील एकमेव फलंदाज आहे, त्याने षटकार लगावून त्रिशतक साजरं केलं आहे.
३) सेहवाग असा फलंदाज आहे की त्याने त्रिशतक हे १०० पेक्षा अधिकच्या स्टाइक रेटने पूर्ण केले आहे.
४) सेहवाग जगातील एकमेव फलंदाज आहे ज्याने वन डे इनिंगची सुरूवात लागोपाठ तीन षटकार लगावून केली आहे.
५) ऑस्ट्रेलियाविरूद्ध ३६० धावांचा पाठलाग करताना सेहवागने पहिल्या चेंडूत षटकार लगावला. तेव्हा स्कोअर होता. १ चेंडू ६ धावा. स्टाइक रेट ६००.
६) पाकिस्तान विरोधातील कसोटी सामन्यात सेहवाग आणि द्रविड ओपनिंगला आले होते. त्यावेळी स्कोअर होता. बिन बाद ४०३, त्यावेळी सेहवाग नाबाद २४७ , द्रविड नाबाद १२८ वर खेळत होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.