नवी दिल्ली : खेळाच्या मैदानावर जय-पराजय होतच राहतो... दिसतच राहतो... पण, खिलाडूपणाची वृत्ती मात्र फारच कमी वेळा दिसते.
अशीच खिलाडूपणाची वृत्ती दिसली ती भारतीय महिला कबड़्डी टीमच्या सामन्यादरम्यान... हा किस्सा थोडा जुना असला तरी याचा व्हिडिओ मात्र सध्या सोशल वेबसाईटवर व्हायरल होताना दिसतोय.
२०१४ साली एशिय गेम्स दरम्यान भारताचा सामना रंगला तो इराणी महिला टीमसोबत... सामना चांगलाच रंगला होता... याच दरम्यान, ईरानच्या एका रेडरचा हिजाब निसटला... त्या दरम्यान भारतीय कबड्डी टीम सहजरित्या त्या महिलेची धरपकड करून आरामात पॉईंट मिळवू शकत होत्या... परंतु, त्यांनी असं केलं नाही.
भारतीय टीमनं मॅच थांबवली... भारतीय खेळाडुंनी ईरानी खेळाडुला हिजाब पुन्हा बांधण्यासाठी कव्हर केलं... ईरानी महिला खेळाडुनं पुन्हा हिजाब परिधान केला... आणि मग पुन्हा एकदा खेळ सुरू झाला.
हिजाब परिधान करणं हा ईरानी संस्कृतीचा एक भाग आहे. भारतीय टीमनं याचा सन्मान केला. ही मॅच भारतीय टीमनं ३१-२१ अशा फरकानं जिंकली होती.