महान क्रिकेटर संगकाराबद्दल १० महत्वाच्या गोष्टी

जगातील महान क्रिकेटरांमध्ये कुमार संगकाराचा समावेश आहे, कुमार संगकाराबद्दल तुम्ही या १० गोष्टी निश्चितच जाणून घ्या.

Updated: Aug 24, 2015, 10:23 AM IST
महान क्रिकेटर संगकाराबद्दल १० महत्वाच्या गोष्टी title=

मुंबई : जगातील महान क्रिकेटरांमध्ये कुमार संगकाराचा समावेश आहे, कुमार संगकाराबद्दल तुम्ही या १० गोष्टी निश्चितच जाणून घ्या.

१) श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या वेबसाईटवर या दिग्गज क्रिकेटरला एका गाण्याने विदाई देण्यात आली. हे गीत कंपोझ केलं आहे, चित्राल सोंपाला आणि गाणं लिहलं आहे, कालुम श्रीमलने.

२) पी सारा ओवल हे तेच मैदान आहे, जे संगकाराने क्रिकेट करिअरला पूर्ण विराम देतं. विशेष म्हणजे हे आशिया खंडाचं एकमेव असं मैदान आहे, ज्यावर डॉन ब्रॅडमॅन खेळले आहेत.

३) संगकारा टेस्ट क्रिकेटमध्ये १० हजार सर्वात वेगवान रन्स बनवणाऱ्या एलीट क्लबमध्ये सामिल आहेत. या क्लबमध्ये सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजचा क्रिकेटर ब्रायन लाराचाही समावेश आहे.

४) संगकाराने आपल्या शेवटच्या टेस्ट मॅचमध्ये भारताच्या अश्विनने संगकाराची विकेट घेतली होती. म्हणजेच सलग चार वेळेस अश्विनने संगाला विदाई दिली. जगातला कोणताच गोलंदाज संगा विरोधात असा कारनामा करू शकला नाही.

५) संगकाराची पत्नी येहाली कोलंबोमध्ये टीव्ही रिपोर्टरच्या भूमिकेत दिसून आली होती. मी संगकाराची पत्नी आहे हे न सांगता तिने संगकाराविषय़ी एका ऑस्ट्रेलियाच्या प्रशंसकाला संगकाराविषयी प्रश्न विचारले होते.

६) संगकाराला लहानपणापासून क्रिकेट आवडत होतं असं काहीही नाही, त्याचा रस अनेक खेळांमध्ये होता. कँडीच्या आपल्या शाळेत त्याने क्रिकेटशिवाय बॅडमिंटन, टेनिस, पोहणे सारख्या खेळांमध्ये चांगलं प्रदर्शन केलं, यानंतर शाळेच्या प्रिन्सिपालने संगकारा आणि त्यांच्या आईने त्याला क्रिकेटवर भर देण्यास सांगितलं.

७) संगकाराला तुम्ही एखाद्या वेळेसच मैदानावर वाद घालत असतांना पाहिलं असेल, मात्र मैदानाबाहेर या उलट असेल. संगकाराचे वडिल हे वकिल होते. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कायद्याचं शिक्षण घेतलं.

८) संगकारा एक चांगला वक्ता देखील आहे. संगकाराने २०११ मध्ये लॉर्डसमध्ये एमसीसी स्पिरीट ऑफ क्रिकेट काउड्रेवर लेक्चरही दिलं होतं. या एका तासाच्या भाषणात वाहवा झाली होती, आणि श्रीलंकेच्या पाठ्यपुस्तकात याचा समावेश देखील करण्यात आला होता.

९) संगकारा सामाजिक कार्यातही आघाडीवर असतो, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमाचं थिंकवाइज इनिशिएटीव्हशी जोडला गेलेला होता. या कार्यक्रम एचआयव्हीचा प्रसार थांबवणे, आणि एड्स प्रभावित लोकांशी होणाऱ्या भेदभावाविरोधात होता.

१०) संगकारा फक्त स्टंम्पच्या मागे कॅच पकडणे एवढंच करत नव्हता, तो व्हायलिनही उत्तम वाजवायचा, संगाला मागील वर्षी ऑगस्टमध्ये टीव्हीवर मुलांमध्ये बसून व्हायलिन वाजवतांना दाखवण्यात आलं होतं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.