या ५ कारणांमुळे जिंकणार टीम इंडिया

आज भारत-वेस्टइंडिज यांच्यामध्ये सेमीफायनलची मॅच मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर रंगणार आहे. मॅचकडे प्रत्येक क्रिकेट चाहत्याचं लक्ष आहे. विराट कोहली आणि क्रिस गेल यांच्यावर सगळा खेळ अवलंबून आहे. त्यामुळे आजची खरी लढत ही कोहली आणि गेल यांच्यामध्येच पाहायला मिळणार आहे.

Updated: Mar 31, 2016, 06:05 PM IST
या ५ कारणांमुळे जिंकणार टीम इंडिया title=

मुंबई : आज भारत-वेस्टइंडिज यांच्यामध्ये सेमीफायनलची मॅच मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर रंगणार आहे. मॅचकडे प्रत्येक क्रिकेट चाहत्याचं लक्ष आहे. विराट कोहली आणि क्रिस गेल यांच्यावर सगळा खेळ अवलंबून आहे. त्यामुळे आजची खरी लढत ही कोहली आणि गेल यांच्यामध्येच पाहायला मिळणार आहे.

या ५ कारणांमुळे जिंकणार भारत

१. अश्विन करणार गेलला फेल : वेस्ट इंडिजकडे गेल सारखा विस्फोटक खेळाडू असल्याने सगळं लक्ष त्याच्याकडे असणार आहे. भारताला ही गेलला लवकरात लवकर कसं आऊट करावं याचं आव्हान असणार आहे. अश्विनकडे मात्र याचं उत्तर आहे. अश्विन गेलला त्याच्या फिरकीमध्ये अटकवून आऊट करु शकतो. अश्विन विरोधात गेलची कामगिरी एवढी चांगली नाही आहे.

२. वेस्ट इंडिजची कामगिरी खराब : वेस्ट इंडिजची कामगिरी तशी काही एवढी चांगली नाही. त्यांच्या खेळीचं कोणी ही गॅरेंटी देत नाही. अफगाणिस्तान सोबत पराभव झाल्यानंतर हे दिसून देखील आलं आहे. संपूर्ण टीम गेलवर अवलंबून आहे.  

३. कोहलीचा जबरदस्त फॉर्म : कोहली हा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याला रोखणं कठिण आहे. जगातील सर्वात चांगला रनचेसर म्हणून आज त्याची ओळख आहे. त्यामुळे कोहली हा वेस्ट इंडिजसाठी नक्कीच पराभवाचं कारण ठरु शकतो. त्यांच्यापुठे विराट हा एकमेव आव्हान असणार आहे. 

४. नेहरा-बुमराची चांगली बॉलिंग : बॉलिंग हा नेहमीच वेस्ट इंडिजसाठी डोकेदुखी ठरली आहे. टी-20 फॉर्मेटमध्ये डेथ ओव्हर सगळ्यात महत्त्वाचे असतात अशा वेळेत आशीष नेहराची लयबद्ध बॉलिंग आणि बुमराचा यॉर्कर बॉल भारतासाठी विजयाचे दरवाजे उघडू शकतात.

५. २०१० नंतर पराभव नाही : वर्ल्डकप आधी अभ्यास मॅचमध्ये टीम इंडियाने वेस्टइंडीजचा पराभव केला होता. याचा देखील मानसिक रित्या फायदा भारताला होणार आहे. भारत 2010 नंतर टी-20 वर्ल्डकपमध्ये वेस्टइंडिजकडून कधी ही पराभूत झालेला नाही. भारतीय मैदानांवर भारत विरोधात खेळणे हे वेस्ट इंडिजसाठी थोडं अवघडंच आहे.