'तीन रुपये... तीन रुपये... टीम इंडिया तीन रुपये'

आधी पाकिस्तान आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेवर विजय... वर्ल्ड कपमध्ये भारताच्या या दमदार परफॉर्मन्समुळं भारतीय प्रेक्षक टीम इंडियावर फिदा आहेतच. शिवाय सट्टे बाजारातही टीमची व्हॅल्यू वाढलीय.

Updated: Feb 24, 2015, 04:18 PM IST
'तीन रुपये... तीन रुपये... टीम इंडिया तीन रुपये' title=

मुंबई : आधी पाकिस्तान आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेवर विजय... वर्ल्ड कपमध्ये भारताच्या या दमदार परफॉर्मन्समुळं भारतीय प्रेक्षक टीम इंडियावर फिदा आहेतच. शिवाय सट्टे बाजारातही टीमची व्हॅल्यू वाढलीय.

वर्ल्ड कप सुरू होण्याआधीच सट्टे बाजारात भारतीय टीम अजिबातच फेव्हरेट नव्हती. मात्र, टीम इंडियाने लागोपाठ दोन दिग्गज टीमना धूळ काय चारली, त्यांचा भाव एकदम वधारलाय.

सूत्रांच्या माहितीनुसार, वर्ल्ड कप सुरू होण्याआधी टीम इंडियाचा रेट होता १३ रूपये... मात्र, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेला मोठ्या फरकानं हरवल्यानंतर टीम इंडियाचा सट्टेबाजारात नवा रेट आहे ३ रूपये...
भारत सेमी फायनलमध्ये पोहचेल का? यावर रेट होता ६ रूपये ३० पैसे... तर आता हा रेट झालाय दीड रूपया...

त्याशिवाय काही टीमच्या रेटमध्येही मोठे फेरबदल झालेत. पाकिस्तानचा रेट आधी २६ रूपये होता... २ मॅच हरल्यानंतर तो ३० रूपयांवर पोहोचलाय. इंग्लंडचा रेट १२ रूपयांवरून १३ रूपये झालाय.

ऑस्ट्रेलियन टीम अजूनही सट्टेबाजांची फेव्हरेट आहे. त्यांचा रेट आधी २ रूपये ५ पैसे होता, तो आता १ रूपये ५५ पैसे झालाय. 

सट्टेबाजांच्या अंदाजानुसार, इंडिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या चार टीम सेमी फायनलपर्यंत धडक मारतील.

आतापर्यंत भारताच्या ज्या दोन मॅचेस झाला, त्यावर हजारो कोटी रूपयांचा सट्टा खेळण्यात आला. त्यामध्ये बुकींचा फायदा झाला, तर सट्टा खेळणारांना मोठा फटका बसला. आता नव्या दरानुसार बेटिंग घेतलं जातंय. तर दुसरीकडं या बेकायदेशीर धंद्याला लगाम लावण्यासाठी पोलिसांनीही कंबर कसलीय.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.