टीम इंडियाचा कर्णधार धोनीने बनविला आणखी एक अनोखा रेकॉर्ड

 गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या फॉर्मबद्दल खूप चर्चा झाली आहे. या दरम्यान दक्षिण आफ्रिकासोबत सुरू असलेल्या सिरिजच्या तिसऱ्या वन डेमध्ये धोनीने आणखी एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 

Updated: Oct 19, 2015, 04:48 PM IST
टीम इंडियाचा कर्णधार धोनीने बनविला आणखी एक अनोखा रेकॉर्ड  title=

नवी दिल्ली :  गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या फॉर्मबद्दल खूप चर्चा झाली आहे. या दरम्यान दक्षिण आफ्रिकासोबत सुरू असलेल्या सिरिजच्या तिसऱ्या वन डेमध्ये धोनीने आणखी एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 

राजकोट वन डेमध्ये धोनीने ६१ चेंडूत ४७ धावांची खेळी केलेल्यानंतर सध्या खेळत असलेल्या वन डे कर्णधारांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा नवा विक्रम त्याने प्रस्थापित केला. 

धोनीने १८४ सामनन्यात कर्णधारपदाची धुरा सांभाळत ५६.८७च्या सरासरीने एकूण ६३१३ धावा केल्या. धोनीने पहिल्यांना वन डे क्रिकेटच्या कर्णधारपदाची धुरा २००७ मध्ये सांभाळली होती. त्यानंतर आतापर्यंत त्याच्याकडे कर्णधारपद आहे. धोनीने कर्णधार म्हणून फलंदाजी करताना ६ शतक लगावले आहेत. पण त्याच्या बॅटमधून ४६ अर्धशतक निघाले आहेत. ८६.५५ च्या स्ट्राइक रेटने बनविल्या या धावांसाठी धोनीने ७२९४ चेंडूंचा सामना केला. 

सध्या क्रिकेट खेळणाऱ्या कर्णधारांपैकी धोनी पहिल्या स्थानावर तर एबी डिव्हिलिअर्स १२ व्या स्थानावर आहे. डिव्हिलिअर्स नावावर ७४ सामन्यात ३६४९ धावा आहेत. धोनीपेक्षा जास्त रन्स आणि कर्णधार असताना बनवलेला ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग निवृत्त झाला आहे. 

पंटरने २३० वन डेमध्ये कर्णधारपद स्वीकारत ४२.९१च्या सरासरीने ८४९७ धावा केल्या आहेत. त्यात २२ शतक आणि ५१ अर्धशतक आहेत. तिसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीवन फ्लेमिंगचा क्रमांक आहे. त्याने २१८ वन डे सामन्यात एकूण ६२९५ धावा केल्या आहेत.

चौथ्या क्रमांकावर श्रीलंकेचा माजी कर्णंधार अर्जुन रणतुंगा, पाचव्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ आहे. सहाव्या स्थानावर अझरुद्दीन आणि सातव्या स्थानावर सौरभ गांगुली याचा क्रमांक लागतो. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.