सुरेश रैना न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेला मुकणार

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसलाय. धरमशाला येथे होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा स्टार फलंदाज सुरेश रैना खेळू शकणार नाही. 

Updated: Oct 13, 2016, 03:35 PM IST
सुरेश रैना न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेला मुकणार title=

मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसलाय. धरमशाला येथे होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा स्टार फलंदाज सुरेश रैना खेळू शकणार नाही. 

बीसीसीआयने आज ही माहिती दिली. सुरेश रैनाला ताप आल्याने तो या सामन्यात खेळणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. दरम्यान, त्याच्या जागी संघात कोणाला स्थान दिले जाणार आहे याची माहिती देण्यात आलेली नाही.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी 6 ऑक्टोबरला टीमची निवड झाली होती. यावेळी सुरेश रैनाला संघात स्थान देण्यात आले होते. ऑक्टोबर 2015मध्ये सुरेश रैना शेवटची वनडे खेळलाय. त्यानंतर तो संघाबाहेर होता. 

वनडे सीरीजचे वेळापत्रक
- पहिली वनडे : 16 ऑक्टोबर, एचपीसीए स्टेडियम (धरमशाला)
- दुसरी वनडे : 19 ऑक्टोबर, फिरोजशाह कोटला (दिल्ली)
- तिसरी वनडे : 23 ऑक्टोबर, पीसीए स्टेडियम (मोहाली)
- चौथी वनडे : 26 ऑक्टोबर, जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम (रांची)
- पाचवी वनडे : 29 ऑक्टोबर, विशाखापट्टणम