आयसीसी टेस्ट रॅंकींगमध्ये अश्विन बनला नंबर १ गोलंदाज

इंदूर कसोटीत दोन्ही डावात मिळून आर.अश्विनने न्यूझीलंडचे १३ गडी बाद केले. तर तीन सामन्यांच्या मालिकेत एकूण २७ विकेट घेतल्या. त्यामुळे अश्विनला मॅन ऑफ द सीरीजचा मान मिळाला. 

Updated: Oct 12, 2016, 10:12 PM IST
आयसीसी टेस्ट रॅंकींगमध्ये अश्विन बनला नंबर १ गोलंदाज title=

मुंबई : इंदूर कसोटीत दोन्ही डावात मिळून आर.अश्विनने न्यूझीलंडचे १३ गडी बाद केले. तर तीन सामन्यांच्या मालिकेत एकूण २७ विकेट घेतल्या. त्यामुळे अश्विनला मॅन ऑफ द सीरीजचा मान मिळाला. 

न्यूजीलंड विरोधातील तिसऱ्या टेस्टमध्ये भारताने विजय मिळवला. सोबतच आर.अश्विनने एक नवा रेकॉर्ड सुद्धा केला आहे. अश्विन टेस्ट क्रिकेटमध्ये 21 वेळा पाचहून अधिक विकेट घेणारा चौथा भारतीय क्रिकेटर बनला आहे.

टीम इंडिया आयसीसी रँकींगमध्ये अव्वल स्थानावर आल्यानंतर आर. अश्विन हा देखील आयसीसी टेस्ट रॅंकींगमध्ये पहिल्या स्थानावर आला आहे. इंदूरमधल्या शेवटच्या मॅचपर्यंत अश्विन तिसऱ्या स्थानावर होता त्याने जेम्स अँडरसन आणि डेल स्टेनला मागे टाकत पहिलं स्थान पटकावलं आहे. ऑलराऊंडरच्या रॅंकींगमध्येही अश्विन अव्वल स्थानावर आहे. 

टेस्ट फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा अजिंक्य रहाणे हा सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. तर चेतेश्वर पुजारा १५ वरुन चौदाव्या स्थानावर आणि विराट कोहली २० वरुन १६ व्या स्थानावर पोहोचला आहे.