सिडनी : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जबरदस्त कामगिरीमुळे भारताचा विराट कोहली टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचलाय. मात्र याचे श्रेय तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देतो. तेंडुलकरच्या सल्ल्यामुळे परिपक्व फलंदाज बनण्यास मदत झाल्याचे कोहलीने यावेळी सांगितले.
कोहलीने पहिल्या टी-२० सामन्यात ९०, दुसऱ्या सामन्यात नाबाद ५९ आणि तिसऱ्या सामन्यात ५० धावांची जबरदस्त खेळी केली. सचिन तेंडुलकमुळे मी क्रिकेट खेळणे सुरु केले. तेंडुलकरच्या खेळाने मला प्रेरणा मिळाली. मी स्वत:ला नेहमी त्यांच्या जागेवर पाहत होतो, असे विराट म्हणाला.
मी खूप भाग्यवान आहे की मला सचिनसोबत खेळायला मिळाले. ते आमचा ड्रेसिंग रुमचा भाग होते. अनेक लहान लहान गोष्टी तो मला सांगायचा यामुळे माझा खेळ सुधारत गेला. त्याच्या सल्ल्यामुळे मी चांगला फलंदाज होऊ शकलोय, असे विराटने यावेळी सांगितले.