हैदराबादचा गुजरातवर ८ विकेट राखून विजय

ग्रीन पार्क मैदानावर रंगलेल्या गुजरात लायन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात रंगलेल्या सामन्यात हैदराबादने बाजी मारलीये. हैदराबादने गुजरातवर ८ विकेट राखून विजय मिळवलाय.

Updated: May 13, 2017, 08:04 PM IST
हैदराबादचा गुजरातवर ८ विकेट राखून विजय title=

कानपूर : ग्रीन पार्क मैदानावर रंगलेल्या गुजरात लायन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात रंगलेल्या सामन्यात हैदराबादने बाजी मारलीये. हैदराबादने गुजरातवर ८ विकेट राखून विजय मिळवलाय.

गुजरात लायन्सने प्रथम फलंदाजी करताना १५४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल हैदराबादने २ विकेटच्या मोबदल्यात हे आव्हान पूर्ण केले. 

डेविड वॉर्नरने ६९ धावांची नाबाद खेळी साकारताना हैदराबादला विजय मिळवून दिला. ४ विकेट घेणाऱ्या मोहम्मद सिराजला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.