ओव्हलः भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत 2-1 अशी विजयाची आघाडी घेणाऱ्य़ा इंग्लंडसाठी खूप चांगली बातमी आहे. शुक्रवार होणाऱ्य़ा ओव्हलवर पाचव्या आणि अंतिम कसोटीत इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज स्टूअर्ट ब्रॉड खेळू शकतो. ब्रॉडने ट्विटरवर नाकावर इजा झालेला एक फोटो टाकला आहे.
त्याने त्यावर लिहिले आहे की ओव्हलमध्ये भेटू "(मुखवट्या सह)" एवढंच नाही तर, तो म्हंणतो इजा झालेल्या जागेवर टाके आहे आणि सकाळी रुग्णालयात देखील जावे लागले. त्याने सुचविले की तो अजूनही खबरदारी म्हणून मास्क लावून खेळू शकतो. ब्रॅाडने ट्वीट केलं की सकाळी थोडं सुजलेलं होतं, पण डॉक्टरांनी टाके टाकून छान काम केलं.
स्टुअर्ट ब्रॉडला नाकावर फ्रॅक्चर असूनही पाचव्या कसोटीसाठी त्याला जागा देण्यात आली आहे. इंग्लंड संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या पहिला डावात फलंदाजी करताना वरुण अॅरॉनचा चेंडू ब्रॉडच्या नाकाला लागला. नंतर ब्रॉडला दुखापत झाल्यामुळे रिटायर्ड हर्ट झाला आणि भारताचे दुसऱ्या डावात त्याला गोलंदाजी करता नाही आली ज्यात भारतीय संघ 43 षटकात गुंडाळला गेला.
इंग्लंडने ब्रॉडला कसोटी मालिकेत संघात दिले याचा अर्थ त्याची इजा गंभीर नाही. पण तो भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार नाही असे त्याने अगोदरच सांगितले होते कारण ब्रॉडला गुडघ्याला इजा झाल्याने तो लवकरच त्याच्या जखमी गुडघ्यावर शस्त्रक्रिया करणार आहे. गुडघा शस्त्रक्रिया झाल्यानंतर ब्रॉडला चार महिने विश्रांती करावी लागणार आहे. ब्रॉडला विश्वचषकापूर्वी संघात परत यायचं आहे.
पाचव्या आणि अंतिम कसोटीसाठी इंग्लंड संघ
अॅलिस्टर कुक (कर्णधार), मोइन अली, जेम्स अँडरसन, गॅरी बॅलन्स, इयान बेल, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, स्टीव्हन फिन, ख्रिस जॉर्डन, सॅम रोबसन, जो रूट, बेन स्टोक्स आणि ख्रिस वोक्स.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.