VIDEO: एका ओवरमध्ये सहा सिक्सर लगावले पण...

 बुशरेंजर्सचा ऑल राउंडर मार्कस स्टोनिस याने बुधवारी एका ओव्हरमध्ये सहा षटकार लगावून क्रिकेटमधील दुर्मिळ यश प्राप्त केले. 

Updated: Jul 9, 2015, 04:17 PM IST
VIDEO: एका ओवरमध्ये सहा सिक्सर लगावले पण...  title=

ब्रिसबेन :  बुशरेंजर्सचा ऑल राउंडर मार्कस स्टोनिस याने बुधवारी एका ओव्हरमध्ये सहा षटकार लगावून क्रिकेटमधील दुर्मिळ यश प्राप्त केले. 

नॅशनल परफॉर्मन्स स्क्वॉडतर्फे वन डे सामना खेळताना स्टोनिस याने नॅशनल इंडिजिनिअस स्क्वॉड विरूद्ध खेळताना एक नवीन रेकॉर्ड बनविला आहे. पार्ट टाइम फास्ट बोलर ब्रेंडन स्मिथ याच्या ओव्हरमध्ये सहा षटकार लगावण्याची किमया स्टोनिस याने केली आहे. आपल्या या खेळीत त्याने ७३ चेंडूत १२१ रन्स बनवले. 

स्टोनिस याने डावाच्या ३६ ओव्हरमध्ये ही कामगिरी केली. ओव्हर सुरू होण्यापूर्वी संघाची धावसंख्या ५ बाद १६५ होती. पहिला चेंडू वाईड होता. त्यानंतर सहा वैध चेंडूंवर लगोपाठ सहा षटकार लगावले, त्यानंतर स्कोअर ५ विकेटवर २०२ असा झाला. त्या ओव्हरमध्ये ६ सिक्सरसह एकूण ३७ धावा बनल्या. 

सर गारफिल्ड सोबर्स 
अधिकृत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये सहा षटकार लगावल्याची कामगिरी आतापर्यंत चार वेळा झाली आहे. सर गारफिल्ड सोबर्स यांनी १९६८मध्ये स्वानसीमध्ये ऩॉटिंगघमशायरकडून ग्लोमरगनच्या मॅक्लम नॅश याला ओव्हरमध्ये सहा षटकार लगावले होते. 

रवि शास्त्री 
त्यानंतर १७ वर्षांनंतर या रेकॉर्डची बरोबरी झाली होती. मुंबईच्या रवि शास्त्री याने बडोद्याविरूद्ध खेळताना रणजी ट्रॉफीमध्ये तिलक राज याच्या एका ओव्हरमध्ये सहा सिक्सर लगावले होते. 

हर्शल गिब्ज
हर्शल गिब्जने आंतरराष्ट्री सामन्यात ही कामगिरी केली आहे. २००७मध्ये वर्ल्डमध्ये नेदरलँडविरूद्ध स्पिनर डॉन वॉन बुंगेच्या एका ओव्हरमध्ये सहा सिक्सर लगावले होते. 

युवराज सिंग 
यानंतर युवराज सिंग याने २००७मध्ये टी-२० वर्ल्ड कपमध्ये इंग्लडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर सहा सिक्सर लगावले होते. 

वरील रेकॉर्डप्रमाणे स्टोनिस याचा हा रेकॉर्ड अधिकृतपणे ग्राह्य धरण्याची शक्यता कमी आहे. त्याने ज्या सामन्यात हा रेकॉर्ड केला त्याला मान्यता नव्हती. 

किरॉन पोलार्ड 
अशी कामगिरी अॅडिलेट स्ट्रायकर्सकडून पोलार्ड याने गेल्या वर्षी केली होती. पण त्या सामन्याला मान्यता नसल्याने त्याचा हा रेकॉर्ड ग्राह्य धरला नव्हता. 

पाहा सहा सिक्सरचा व्हिडिओ 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.