टी-२० मध्ये ८ हजार रन्स पूर्ण करणारा गेल पहिला फलंदाज

 वेस्ट इंडिजचा स्फोटक सलामीवीर फलंदाज क्रिस गेल क्रिकेटचे सर्वात छोटे प्रारूप असलेल्या टी-२० क्रिकेटमध्ये ८००० रन्स पूर्ण करणार जगातील पहिला फलंदाज बनला आहे. 

Updated: Jul 8, 2015, 07:47 PM IST
 टी-२० मध्ये ८ हजार रन्स पूर्ण करणारा गेल पहिला फलंदाज title=

नवी दिल्ली :  वेस्ट इंडिजचा स्फोटक सलामीवीर फलंदाज क्रिस गेल क्रिकेटचे सर्वात छोटे प्रारूप असलेल्या टी-२० क्रिकेटमध्ये ८००० रन्स पूर्ण करणार जगातील पहिला फलंदाज बनला आहे. 

या डावखुऱ्या फलंदाजाने ही कामगिरी कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या टी-२० सामन्यात जमैकाकडून खेळताना पूर्ण केली आहे. किंग्स्टनमध्ये सेंट लुसिया जाऊक्स विरोधात खेळताना गेलने नाबाद ६५ रन्स केल्या. 

विविध देशांच्या टी-२० सामन्यात खेळणाऱ्या क्रिस केल याने आतापर्यंत २१७ टी-२० सामने खेळले आहेत. त्यात ८०३७ रन्स काढल्या आहेत. त्यात १५ शतक आणि ५२ अर्धशतक केले आहे. त्यात त्याने ४४.४० च्या सरासरीने आणि १४८.८६ स्ट्राइक रेटने हे रन्स काढले आहेत. 

टी-२० सर्वाधिक रन्स बनविणाऱ्यांच्या यादीत ३५ वर्षीय गेलनंतर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ब्रॅड हॉज याचा क्रमांक लागतो, त्याने ६४७१ रन्स केले आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.