सौम्य सरकारचा हा कॅच झाला सर्वांच्याच चर्चेचा विषय

कोलकत्ता : बुधवारी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या दरम्यान कोलकत्त्यातील एडन गार्डन्स झालेल्या टी २० वर्ल्ड लीग सामन्यात बांगलादेशी क्रिकेटर सौम्य सरकार याने घेतलेला एक कॅच आज सर्वांच्याच चर्चेचा विषय झालाय. 

Updated: Mar 16, 2016, 06:17 PM IST
सौम्य सरकारचा हा कॅच झाला सर्वांच्याच चर्चेचा विषय  title=

कोलकत्ता : बुधवारी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या दरम्यान कोलकत्त्यातील एडन गार्डन्स झालेल्या टी २० वर्ल्ड लीग सामन्यात बांगलादेशी क्रिकेटर सौम्य सरकार याने घेतलेला एक कॅच आज सर्वांच्याच चर्चेचा विषय झालाय. १७ व्या ओव्हरच्या पाचव्या बॉलला ही कमाल घडली. अराफत सन्नीच्या चौथ्या ओव्हरमधील पहिल्या दोन बॉल्सवर एक एक रन काढण्यात आली. तिसऱ्या बॉलवर मोहम्मद हाफिजने चौका लगावला. चौथ्या बॉलवर एक सिक्सर लगावण्याच्या इराद्यात तो होता.

बॉल त्याच्या बॅटला लागला आणि बाऊंड्रीकडे गेला. पण, सौम्य सरकारने बाऊंड्रीवरच त्याचा कॅच घेतला. पण, त्याचा पाय बाऊंड्रीपलीकडे जात असल्याचे जाणवल्यावर त्याने तो बॉल हवेत उडवला. आणि बॉल हवेत असतानाच तो बाऊंड्रीच्या पलीकडे जाऊन पुन्हा आत आला आणि त्याने तो कॅच घेतला. त्याचा हा कॅच आज सर्वांच्याच चर्चेचा विषय झाला.