रिओ : भारताच्या पी सिंधूने जपानच्या नोझोम ओकुहारा हिला २१-१९ आणि २१-१० नमवत फायनलमध्ये धडक मारली.
भारताची पहिला बॅडमिंटनपटू जिने फायनल गाठली आहे. आता तिचा पुढील सामना वर्ल्ड नंबर वन मारिन कोरोलिना या स्पेनच्या बॅडमिंटनपटूशी होणार आहे.
सिल्व्हर फिक्स
भारत आता गोल्डसाठी प्रयत्न करणार आहे. उद्याचा सामना कसा रंगणार यावर भारताला गोल्ड मिळत का सिल्व्हर हे ठरणार आहे. सिंधू पराभूत झाली तरी तिचे सिल्व्हर फिक्स झाले आहे.