माझ्यामध्येच कमी, आणखी चांगला खेळाडू होईन

टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला. या मॅचसाठी फॉर्ममध्ये नसलेल्या शिखर धवनऐवजी अजिंक्य रहाणेचा टीममध्ये समावेश करण्यात आला. 

Updated: Apr 2, 2016, 09:57 PM IST
माझ्यामध्येच कमी, आणखी चांगला खेळाडू होईन title=

मुंबई: टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला. या मॅचसाठी फॉर्ममध्ये नसलेल्या शिखर धवनऐवजी अजिंक्य रहाणेचा टीममध्ये समावेश करण्यात आला. 

शिखर धवनला पहिल्या चार मॅचमध्ये संधी देऊनही चांगली कामगिरी करण्यात आली नाही. याबाबत धवननं खंत व्यक्त केली आहे. माझ्यामध्येच काही कमी असेल, मला पाहिजे तशी कामगिरी झाली नाही, चुका सुधारून आणखी चांगला खेळाडू व्हायचा प्रयत्न करीन असं ट्विट शिखर धवननं केलं आहे.