मुंबई : क्रिकेट वर्ल्ड कप १०१५ ला आता खऱ्या अर्थाने सुरूवात होणार आहे. २९ दिवस आणि ४२ सामन्यांनंतर १४ टीम्समधून क्वार्टर फायनल खेळण्यासाठी ८ टीम सज्ज झाल्या आहेत.
क्वार्टर फायनल मधील सामने नॉकआऊट असल्याने या खेळातील खरा दबाव या फेरीमध्ये प्रेक्षकांना पहायला मिळेल. त्यामुळे या सामन्यांचा दबाव खेळाडूंवर जेवढा असेल तेवढाच प्रेक्षकांवरही असेल.
भारतासाठी क्वार्टर फायनल मधील सामना सोपा मानला जात आहे. कारण भारताचा सामना ग्रुप A मधील तुलनेने कमकुवत असलेल्या बांगलादेश विरूद्ध होणार आहे. मात्र ते इंग्लंडला पराभूत करून क्वार्टर फायनलमध्ये आलेत. त्यामुळे त्यांना कमी समजण्याची चू्क भारत कदापी करणार नाही.
वर्ल्ड कपमधील काही गोष्टी जाणून घेणे महत्वाचे आहे.
१- वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिका एकही नॉकआऊट सामना जिंकलेला नाही.
२- जर नॉकआऊट सामन्यामध्ये त्या दिवशी काही निर्णय न आल्यास प्रत्येत सामन्यासाठी एक राखीव दिवस असणार आहे.
३- ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान क्वार्टर फायनल मध्ये अॅडिलेड येथे खेळणार आहेत. ऑस्ट्रेलियाची या वर्ल्ड कपमध्ये अॅडिलेडमध्ये खेळण्याची पहिलीच वेळ असणार आहे.
४- वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशची नॉकआऊट फेरीमध्ये खेळण्याची ही पहिली वेळ असणार आहे.
५- भारत आणि न्युझिलंड या दोन्ही टीम या वर्ल्ड कपमध्ये एकही सामना हरलेले नाहीत आणि आपआपल्या गटात अव्वल स्थानावर आहेत.
६- राखीव दिवशीही जर एखादा सामना अनिर्णित राहील्यास त्यांचा निर्णय टीमच्या पहिल्या फेरीतील आपल्या गटातील कामगिरीवर घेण्यात येईल.
७- जर अंतिम सामना टाय झाला तर विजेता सूपर ओव्हरने ठरविण्यात येईल.