येत्या टी-२० विश्वचषकात दिसणार सेहवाग

मुंबई : भारताचा माजी आक्रमक बॅट्समन वीरेंद्र सेहवाग येत्या आयसीसी टी २० विश्वचषकात दिसणार आहे. 

Updated: Feb 29, 2016, 01:50 PM IST
येत्या टी-२० विश्वचषकात दिसणार सेहवाग title=

मुंबई : भारताचा माजी आक्रमक बॅट्समन वीरेंद्र सेहवाग येत्या आयसीसी टी २० विश्वचषकात दिसणार आहे. नाही, तो मैदानावर नसेल, तर तो एक नवीन इनिंग खेळताना दिसेल. 

'क्रिकबझ' या क्रिकेट वेबसाईटने त्याला जाणकार या पदावर नियुक्त केले आहे. टेलिव्हिजनवर तो या भूमिकेत यापूर्वीही दिसला आहे. पण, क्रिकबझने आता त्याला करारबद्ध केले आहे. त्यामुळे आता जगभर क्रिकबझ वापरणाऱ्या ग्राहकांच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना तो उत्तरे देणार आहे. 

या वेबसाईटच्या फेसबूक पेजच्या माध्यमातून साहवागच्या चाहत्यांना त्याच्याशी संवाद साधता येणार आहे. हा करार जेव्हा पार पडला तेव्हा तो म्हणाला, "टी२० मला स्वतःला आवडतं. मी आजही जेव्हा हा खेळ बघतो तेव्हा मला माझे खेळतानाचे दिवस आठवतात. मला आता या भूमिकेसाठी खूपच उत्सुकता आहे." सेहवागचे चाहते याबद्दल उत्सूक असतील यात काही शंका नाही.