सेहवाग होता भारताचा पहिला टी-२० कर्णधार

तुम्हाला माहीत आहे का भारताने खेळलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात कर्णधारपद कोणत्या क्रिकेटरकडे सोपवण्यात आले होते. 

Updated: Mar 9, 2016, 03:52 PM IST
सेहवाग होता भारताचा पहिला टी-२० कर्णधार title=

नवी दिल्ली : तुम्हाला माहीत आहे का भारताने खेळलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात कर्णधारपद कोणत्या क्रिकेटरकडे सोपवण्यात आले होते. 

१ डिसेंबर २००६मध्ये भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळला होता. यात एमएस धोनी अथवा सचिन तेंडुलकर नव्हे तर माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग भारतीय संघाचा कर्णधार होता. 

या पहिल्या सामन्यात भारताने आफ्रिकेवर सहा विकेट राखून विजय मिळवला होता. या सामन्यात सेहवाग, दिनेश कार्तिक आणि दिनेश मोंगिया यांनी विजयात मोलाची भूमिका बजावली होती. 

या सामन्यात धोनीही सेहवागच्या नेतृत्वाखाली खेळला मात्र खाते न खोलता तो पॅव्हेलियनमध्ये परतला. कार्तिकला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.