बँकेच्या रांगेत उभे राहून त्रस्त झालेल्यांसाठी सेहवागचा खास मेसेज

सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर देशभरातील बँका तसेच एटीएमच्या बाहेर लोकांच्या मोठमोठ्या रांगा लागतायत. सरकारच्या या निर्णयाला अनेकांनी समर्थन दिलेय तर काहींचा विरोध आहे.

Updated: Nov 15, 2016, 11:35 AM IST
बँकेच्या रांगेत उभे राहून त्रस्त झालेल्यांसाठी सेहवागचा खास मेसेज title=

मुंबई : सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर देशभरातील बँका तसेच एटीएमच्या बाहेर लोकांच्या मोठमोठ्या रांगा लागतायत. सरकारच्या या निर्णयाला अनेकांनी समर्थन दिलेय तर काहींचा विरोध आहे.

बँक तसेच एटीएममध्ये पैसे बदलण्यासाठी तसेच भरण्यासाठी मोठमोठ्या रांगामध्ये उभे रहावे लागत असल्याने सामान्य नागरिक त्रस्त झालेत. या त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने एक मेसेज दिलाय.

याआधीही सेहवागने मोदींच्या या निर्णयाला समर्थन दर्शवले होते.