'फुलराणी' जागतिक क्रमवारीत पुन्हा अव्वल

भारताची 'फुलराणी' बॅडमिंटनपटू सायना नेहवालने जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवलंय. जागतिक बॅडमिंटन संघटनेनं गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या महिला एकेरीच्या क्रमवारीमध्ये सायना पहिल्या स्थानावर आहे.

Updated: May 22, 2015, 03:42 PM IST
'फुलराणी' जागतिक क्रमवारीत पुन्हा अव्वल title=

मुंबई : भारताची 'फुलराणी' बॅडमिंटनपटू सायना नेहवालने जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवलंय. जागतिक बॅडमिंटन संघटनेनं गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या महिला एकेरीच्या क्रमवारीमध्ये सायना पहिल्या स्थानावर आहे.

सायना एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाही पहिल्या स्थानावर होती. त्यानंतर तिच्या क्रमवारीत पुन्हा घसरण झाली होती. २६ मे पासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरिजपूर्वी सायनाला पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळालंय. मागच्या वेळी सायनानं ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीजचे जेतेपद पटकावले होते. 

यावेळी पी.व्ही.सिंधूच्या क्रमवारीत घसरण झाली असून, ती बाराव्या स्थानावर आहे. पुरुष एकेरीत के. श्रीकांत चौथ्या स्थानावर कायम आहे. पी.कश्यप आणि एच.एस.प्रणोय यांनी अनुक्रमे १३ वं आणि १५ वं स्थान कायम राखलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.