'बालभारती'मध्ये मुलं अभ्यासणार कविताची उज्ज्वल कारकीर्द!

भारताची आंतरराष्ट्रीय दर्जाची धावपटू 'सावरपाडा एक्स्प्रेस' कविता राऊत हिच्या खडतर वाटचालीची दखल बालभारतीने घेतली आहे. कविता राऊतची उज्ज्वल कारकिर्द आता मुलांना अभ्यासासाठी येणार आहे. 

Updated: May 22, 2015, 04:07 PM IST
'बालभारती'मध्ये मुलं अभ्यासणार कविताची उज्ज्वल कारकीर्द! title=

मुंबई: भारताची आंतरराष्ट्रीय दर्जाची धावपटू 'सावरपाडा एक्स्प्रेस' कविता राऊत हिच्या खडतर वाटचालीची दखल बालभारतीने घेतलीय. कविता राऊतची उज्ज्वल कारकिर्द आता मुलांना अभ्यासासाठी येणार आहे. 

कविताच्या पाठाचा समावेश यंदा बालभारतीच्या इयत्ता पाचवीच्या नव्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. कविता राऊत सध्या मुक्त विद्यापीठातून पदवी घेत आहे. तिचा जीवनपट मांडणारा प्रेरणादायी पाठ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या 'यशवार्ता’ या मासिकाचे कार्यकारी संपादक संतोष साबळे यांनी लिहिला होता.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने येत्या शैक्षणिक वर्षापासून या पाठाचा समावेश अभ्यासक्रमात करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रतिकुलतेवर मात करीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेवर मोहोर उमटविणाऱ्या कविता राऊत हिच्या संघर्षमय प्रवासावरील हा धडा आता राज्यातील सुमारे ५० लाख विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा ठरणार आहे.

'सावरपाड्याचे नाव देशभर झाले असले तरी माझ्या जीवन प्रवासावरील धडय़ाचा बालभारतीने अभ्यासक्रमात समावेश केल्याने खूप आनंद होतोय. राज्यातील मुलींनी शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्राकडे वळायला हवं, असं मला वाटतं' अशी भावना कवितानं व्यक्त केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.