मुंबई : आयपीएलच्या दहाव्या मोसमात फायनलमध्ये मुंबई इंडियन्सनं पुण्याचा पराभव करून आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. नेहमीप्रमाणेच यंदाच्या वर्षीही अनेक नवोदित खेळाडूंनी त्यांची प्रतिभा दाखवली. पण टी-20 क्रिकेटमधल्या भारताच्या दिग्गज खेळाडूंना समाधानकारक कामगिरी करता आली नाही.
विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग आणि सुरेश रैना या खेळाडूंची कामगिरी निराशाजनक झाली. यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण पाच सेंच्युरी झळकावण्यात आल्या. यामध्ये फक्त संजू सॅमसन या एकाच भारतीयाचं नाव आहे.
पुण्याविरुद्धच्या मॅचमध्ये संजूनं ६३ बॉल्समध्ये १०२ रन्सची खेळी केली. यामध्ये ८ फोर आणि ५ सिक्सचा समावेश होता. आयपीएलच्या दहाव्या मोसमात राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत आणि मनन व्होरा हे युवा खेळाडू नाईनटीजमध्ये आऊट झाले.
यंदाच्या आयपीएलमध्ये सॅमसनबरोबरच पंजाबच्या हशीम अमलानं दोन, हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नरनं आणि पुण्याच्या बेन स्टोक्सनं सेंच्युरी झळकावली.