ब्रिस्बेन : भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि अमेरिकेच्या बेथानी मँटेक-सँडसने या वर्षातील पहिल्या जेतेपदावर नाव कोरलेय. या दोघींनी ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकाटेरिना माकारोव्हा आणि एलिना व्हेसनिना या रशियन जोडीवर विजय मिळवला.
सानिया- बेथानीने या रशियन जोडीला 6-2,6-3 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. या विजयासोबतच नव्या वर्षातील त्य़ांचे पहिले जेतेपद ठरले. मात्र सानियाने अव्वल रँकिंग गमावलेय. तब्बल 91 आठवडे सानिया दुहेरीत अव्वल स्थानी होती. मात्र आता सानियाच्या जागी बेथानीने अव्वल स्थान मिळवलेय.
या जेतेपदामुळे सानियाचा आत्मविश्वास चांगलाच उंचावला असेल. काही दिवसांतच ऑस्ट्रेलियन ओपन सुरु होणार असल्याने सानिया या स्पर्धेतही असेच सातत्य राखेल.