नवी दिल्ली : सानिया मिर्झा आपल्या टेनिस करिअरमधील सातव्या ग्रँडस्लॅमपासून एक पाऊल दूर आहे.
सानिया आणि तिचा क्रोएशियन पार्टनर इव्हान डोडिंगनं मिक्स डबल्समध्ये दिमाखात ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल गाठली.
सानिया-डोडिंग जोडीनं समांथआ स्टोसूर आणि सॅम ग्रोथ या जोडीवर 6-4,2-6,10-5 अशा फरकानं मात केली.
दुसरा सेट गमावल्यानंतर सानिया-डोडिंगनं ही लढत 1 तास आणि 18 मिनिटांत जिंकली. आता, सानियाकडून फायनलमध्येही अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पेस आणि बोपन्नाला झटपट गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतर भारताच्या साऱ्या आशा या सानियावर आहेत.